Accident News : मित्रांसोबत महाबळेश्वरला फिरायली निघाले, मात्र वाटेतच मृत्यूने गाठलं

Satara Accident News : शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ट्रक चालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुजीत आंबेकर, सातारा

पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. रुबेल सिन्हा मृत तरुणीचं नाव आहे. रुबेल पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुबेल रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(नक्की वाचा-  Delhi News: रात्रभर छोले भिजत ठेवले; सकाळी दोघांचे मृतदेह आढळले; कशामुळे जीव गेला?)

घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी धाव पोहोचले. त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुबेल हिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

(नक्की वाचा- 'मला माझ्या पत्नीला न्याहाळायला आवडतं'; 70 तासांच्या कामावरील आनंद महिंद्रांच्या विधानानं जिंकली मनं!)

शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ट्रक चालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article