Read more!

Satara News : पाचगणीत आढळले पांढरे सांबर; सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन

Satara news : पांढरे सांबर दुर्मिळ असून, अॅल्बनो प्रजातीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान वनसंपदेचे संरक्षण होणे महत्त्वाचे असून वनव्यामध्ये वन्यजीवांसह सजीव सृष्टी होरपळत आहे. निसर्गच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुजीत आंबेकर, सातारा

पाचगणी परिसरात दुर्मिळ प्रजातीचे पांढरेशुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. सिडनी पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरापासून काही अंतरावर हे सांबर आढळून आले आहे. यामुळे सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हे सांबर दुर्मिळ असून, अॅल्बनो प्रजातीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान वनसंपदेचे संरक्षण होणे महत्त्वाचे असून वनव्यामध्ये वन्यजीवांसह सजीव सृष्टी होरपळत आहे. निसर्गच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Pregnant Woman Thrown : गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून फेकले, तामिळनाडूतील संतापजनक घटना)

काही दिवसापासून पाचगणी महाबळेश्वर परिसरातील डोंगररांगांमध्ये सुरू झालेल्या वणव्यांच्या सत्रामुळे निसर्गाच्या ऱ्हासाबरोबरच वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा व संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेली पाचगणी, महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे पर्यटनाबरोबरच दुर्मिळ वनौषधी तसेच वन्यजीवांमुळे प्रसिद्ध आहेत. या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो. हॅरिसन फॉली येथून डोंगरदऱ्यातून आकाशातून स्वछंद विहार करताना अनेकदा खाली वन्यप्राण्यांचा वावर दृष्टीस पडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. 

Advertisement

(नक्की वाचा- Ratan Tata : रतन टाटांच्या मृत्यूपत्रात 'या' व्यक्तीचं नाव वाचून अनेकजण चकीत, मिळणार जवळपास 500 कोटींची संपत्ती)

दरवर्षीच्या वणव्याच्या दाहकतेबद्दल चिंता व्यक्त करताना किसन वीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, पाचगणी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. जयवंतराव चौधरी म्हणाले, "वणवा लागल्यानंतर तो वेगाने फैलावतो आणि पर्यावरणाचा नाश करतो. जंगलातील वनस्पतींना हानी पोहचते. त्यामुळे अनेक प्रजातींचे अस्तित्व संकटात येते. जंगलातील विविध वनस्पती आणि प्राणी एकमेकांच्या सहकाऱ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे वनव्याबाबत जनजागृती होणे गरजेचे असून वनव्यावर पूर्णपणे पायबंद घातले पाहिजेत अन्यथा सजीवसृष्टी नष्ट होईल",अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article