Exclusive: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या 2 दिवस आधी काय घडलं? आरोपी प्रशांतच्या बहिणीने सगळं सांगितलं

Satara Doctor Suicide Case: डॉक्टर तरुणीने माझ्या भावाला लग्नासाठी विचारणा केली होती, मात्र माझ्या भावाने तिला यासाठी स्पष्ट नकार दिला होता, असे प्रशांतच्या बहिणीने सांगितले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, NDTV मराठी

Satara News: साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता, त्यावरून पोलिसांनी प्रशांतला अटक केली आहे. मात्र, प्रशांत बनकरच्या बहिणीने एनडीटीव्ही मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधत डॉक्टर तरुणीनेच आपल्या भावाला 'टॉर्चर' केल्याचा मोठा आणि गंभीर आरोप केला आहे.

प्रशांत बनकरच्या बहिणीचा दावा

डॉक्टर तरुणीने माझ्या भावाला लग्नासाठी विचारणा केली होती, मात्र माझ्या भावाने तिला यासाठी स्पष्ट नकार दिला होता, असे प्रशांतच्या बहिणीने सांगितले आहे. डॉक्टर तरुणी मानसिक तणावात असल्याचे तिच्या वागणुकीतून दिसून येत होते. त्या नोकरीतील त्रासाबद्दलही आमच्या घरात सांगायच्या. त्या खूप टेन्शनमध्ये असायच्या. प्रशांतच्या बहिणीनुसार, डॉक्टर तरुणी नेहमी प्रशांतशी संपर्कात राहायची. मृत्यूआधीही ती त्याला वारंवार कॉल करत होती.

(नक्की वाचा- Satara Doctor Suicide Case: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक)

फोटोवरून किरकोळ वाद

दिवाळीत त्यांचा माझ्या भावासाोबत किरकोळ शाब्दिक वाद झाला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'फोटो नीट काढले नाही' म्हणून प्रशांतला डॉक्टर मोठ्याने बोलल्या होत्या. यावर प्रशांतने देखील 'माझ्याशी असं बोलायचं नाही' असे म्हटले होते. यावरून त्या सतत 'मी मानसिक तणावात असताना तू माझ्याशी असं कसं बोलला,' असं प्रशांतला टॉर्चर करत होत्या. डॉक्टरांनी वारंवार तक्रार केल्याने प्रशांत माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला, असं प्रशांतच्या बहिणीने सांगितलं.

डॉक्टर तरुणी मानसिक तणावात असायच्या आणि त्यांच्या वागणुकीतून ते दिसत होते. त्या आमच्या घरात अगदी घरच्यांसारखे राहत होत्या. या प्रकरणाचा तपास आता दोन्ही बाजूकडील माहितीच्या आधारावर अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Satara Doctor Death: डॉक्टर तरुणीनेच प्रपोज केलं? प्रेमासाठी टॉर्चर.. फलटण आत्महत्या प्रकरणात खळबळजनक दावा)

प्रशांतच्या बहिणीचे मोठे खुलासे

  • बनकर कुटुंबीय आणि डॉक्टर तरुणीचे कुटुंब यांनी एकत्रित देवदर्शन देखील केले होते.
  • प्रशांत आजारी असताना त्याची आणि महिला डॉक्टरची ओळख झाली होती.
  • प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी यासंदर्भातले पुरावे पोलिसांना दिले आहेत.
  • प्रशांतला पोलिसांनी घरातूनच अटक केली.

डॉक्टर तरुणीच्या सुसाईड नोटमध्ये प्रशांतवर आरोप असून, आता प्रशांतच्या बहिणीने केलेल्या या उलट खुलाशामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.