Satara Rain News : सातारकरांची पाण्याची चिंता मिटली; कास धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो

Satara News : पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच पर्यटनस्थळे 19 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद असतील. 

जाहिरात
Read Time: 1 min

राहुल तपासे, सातारा

सातारा शहराची लाईफ लाईन असणारे म्हणजेच संपूर्ण  सातारा शहराला पाणी पुरवठा करणारे कास धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गुरुवारी रात्र कास धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सततच्या पावसामुले अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कास धरणातून सातारा शहराला नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. कास पठार परिसरातील 15 गावांना देखील कास धरणातून पाणीपुरवठा केला जातो.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पावसाचा जोर आजही कायम असणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासाकरिता सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोणती ठिकाणे पर्यटकांसाठी बंद असणार?

सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. साताऱ्यातील निसर्ग आता पर्यटकांना खुणावत आहे. मात्र पर्यटकांना अनेक पर्यटनस्थळावर इच्छा असूनही जाता येणार नाही. कारण पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच पर्यटनस्थळे 19 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद असतील. 

( नक्की वाचा : Pune Palkhi 2025: पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, वाचा सर्व अपडेट सविस्तर )

  • अजिंक्यतारा किल्ला 
  • ठोसेघर धबधबा 
  • केळवली-सांडवली धबधबा 
  • वजराई धबधबा
  • कास पुष्प पठार 
  • एकीव धबधबा 
  • कास तलाव
  • बामणोली 
  • पंचकुंड धबधबा 
  • सडावाघापूर उलटा धबधबा 
  • ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा 
  • रुद्रेश्वर देवालय धबधबा 
  • ओझर्डे धबधबा
  • घाटमाथा धबधबा 
  • लिंगमळा धबधबा 
  • महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ आणि सर्व  धरणे

Topics mentioned in this article