Maharashtra Budget Session 2026: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अभुतपूर्व असा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी धक्काबुक्की झाली. तसेच शिवसेनेचे दोन सदस्यही पळवण्यात आले. आज राज्याच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
सातारा एसपींच्या निलंबनाचे आदेश
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या मोठ्या राड्याचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळाले. शिवसेना नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेमध्ये याच मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंत कधीही मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही. १०-१० पोलिसांनी मला पकडले होते. कोणी कंबरेला, कोणी हाताला धरुन ओढत होते. या राड्यामध्ये मला जखम झाली. पोलीस प्रशासन अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागली, असं शंभुराज देसाई यावेळी म्हणाले.
Pune News: पुण्यात MPSC, UPSC विद्यार्थ्यांची उपासमार; 'इडली'वर भागवावी लागतेय भूक
शंभुराज देसाईंचा संताप
"ज्या दोन सदस्यांवर गुन्हा दाखल झाला होता ते संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे आमच्यासोबत होते. आमच्या दोन सदस्यांना अटक करायची होती तर हॉटेलबाहेर करायचे होते, तिथे धाडस झाले नाही. माझे अंग अजून ठणकत आहे. मला सदस्यासह फरफटत नेले, नितीन पाटलांनाही ओढले. साध्या वेशातले 100 पोलीस त्याठिकाणी होते. एवढा माजोरडापणा कधी पाहिला नाही," अशा शब्दात शंभुराज देसाईंनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोषी, एलसीबीचा देवकर, असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी शंभुराज देसाईंनी केली. त्यानंतर उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले आहेत. तसेच त्याठिकाणी असणाऱ्या इतर पोलिसांवरही कारवाईचे आदेश दिले आहेत.
(नक्की वाचा- Ashok Kharat Case: अशोक खरातचा लोकांना फसवण्याचा 'रिमोट कंट्रोल' पॅटर्न, पैसे कसे उकळायचा?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world