सुनील दवंगे, अहिल्यानगर
Sangamner News : राजकीय वर्तुळात नेहमीच एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ नुकतेच एकत्र दिसून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आरतीवेळी हे दोन्ही नेते एकत्र आले होते. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, 'तुम्ही बसा भांडत... नेते आले एकत्र' अशा आशयाच्या पोस्ट सध्या संगमनेर तालुक्यात जोरदार व्हायरल होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय वाद सुरू आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी थोरात आणि तांबे यांना जोरदार लक्ष्य केले होते. यानंतर दोन्ही नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.
(नक्की वाचा- GST Rate Cut: सर्वसामन्यांना मोठा दिलासा! जीएसटी कर बदलांमुळे 'या' वस्तू होणार स्वस्त, वाचा यादी)
ज्यावेळी दोन नेते एकमेकांवर राजकीय टीका करतात, तेव्हा त्यांचे समर्थकही आपापल्या नेत्यांच्या बाजूने उभे राहतात. मात्र, जेव्हा हे नेते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येतात, तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये बुचकळ्यात पडतात. तांबे आणि खताळ यांच्या एकत्र येण्यामुळे संगमनेरच्या राजकारणात भविष्यात काही नवीन समीकरणे तयार होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.