
GST Council Meet: जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून, यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने 12% आणि 28% चे जीएसटी स्लॅब रद्द करून, त्याऐवजी 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाला सर्व राज्यांनी सहमती दिली असून, त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
सरकारने अनेक रोजच्या वापराच्या वस्तूंपासून ते हेल्थकेअर आणि वाहनांपर्यंतच्या वस्तूंवरील जीएसटी दरात कपात केली आहे. यामुळे दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठी भेट मिळाली आहे.
कोणत्या वस्तू झाल्या स्वस्त?
रोजच्या वापरातील वस्तू
- हेअर ऑईल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम : 18% वरून 5%
- लोणी, तूप, चीज: 12% वरून 5%
- पॅकेटमधील नमकीन, भुजिया, मिक्सर : 12% वरून 5%
- फीडिंग बॉटल्स, लहान मुलांचे डायपर्स: 12% वरून 5%
- शिलाई मशीन आणि त्याचे सुटे भाग: 12% वरून 5%
(नक्की वाचा- GST Reforms: : कररचनेत क्रांती! जीएसटीचे 12% आणि 28% चे स्लॅब रद्द, जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा)
आरोग्य आणि शैक्षणिक वस्तू
- हेल्थ इन्शुरन्स: 18% वरून 0%
- थर्मामीटर: 18% वरून 5%
- मेडिकल ग्रेड ऑक्सिजन: 12% वरून 5%
- ग्लूकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स: 12% वरून 5%
- नकाशे (Maps), चार्ट, ग्लोब: 12% वरून 0%
- पेन्सिल, शार्पनर, नोटबुक्स: 12% वरून 0%
- रबर: 5% वरून 0%
वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी उत्पादनेही स्वस्त
- पेट्रोल आणि पेट्रोल हायब्रिड कार, सीएनजी कार (1200 सीसी आणि 400 एमएम पेक्षा जास्त नाही): 28% वरून 18%
- डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार (1500 सीसी आणि 400 एमएम पेक्षा जास्त नाही): 28% वरून 18%
- 3 व्हीलर्स: 28% वरून 18%
- मोटरसायकल (350 सीसी आणि त्याखालील): 28% वरून 18%
- एसी, टीव्ही (32 इंच पेक्षा जास्त), एलईडी (LED) आणि एलसीडी (LCD): 28% वरून 18%
- मॉनिटर आणि प्रोजेक्टर: 28% वरून 18%
कृषी क्षेत्राला दिलासा
- ट्रॅक्टरचे टायर आणि भाग: 18% वरून 5%
- ट्रॅक्टर: 12% वरून 5%
- बायो पेस्टिसाइड: 12% वरून 5%
- सिंचन प्रणाली : 12% वरून 5%
- सिमेंट वरही 28% ऐवजी 18% जीएसटी लागणार आहे, ज्यामुळे घर खरेदी स्वस्त होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world