Vision and Nation Building : शिवरायांवर पदव्युत्तर शिक्षण, पुणे विद्यापीठात नवा अभ्यासक्रम कधीपासून सुरू होणार? प्रवेश कसा घ्याल?

Savitribai Phule Pune University : सध्या याच विषयावर संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागात पीजी डिप्लोमा कोर्स सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

MA course on Shivaji Maharaj : पुण्यातून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये शिवरायांवर पदव्युत्तर (MA) अभ्यासक्रम सुरू होणार आहे. शिवजयंती निमित्त विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे 'व्हिजन अँड नेशन बिल्डिंग' यावर (Vision and Nation Building) पूर्ण वेळ MA अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.  

19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. परदेशातही महाराजांच्या पराक्रमांचा गौरव दाखविणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या नव्या अभ्यासक्रमामुळे शिवप्रेमींना महाराजांच्या कारकीर्दीची इत्यंभूत माहिती मिळणं सोपं झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थी विद्यापीठाच्या CET परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमासाठी एकूण 20 जागा विद्यापीठात उपलब्ध आहेत. सध्या याच विषयावर संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागात पीजी डिप्लोमा कोर्स सुरू आहे. परंतु येत्या शैक्षणिक वर्षात यावर MA अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.  

नक्की वाचा - Shivjayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?

भारतीय राष्ट्रउभारणीची प्रक्रिया आणि त्यावर शिवरायांची भूमिका यावर आढावा घेण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज आणि स्वराज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, युद्ध, रणनीती आणि प्रशासन या विषयांचे त्यांचे विचार, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक विचारसरणीच्या मुद्द्यांचा समावेश असेल.