Coastal Road Tunnel: 12,000 कोटी रुपयांचा खर्च, तरीही कोस्टल रोडच्या बोगद्याला का लागली गळती?   

Coastal Road Tunnel: सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम करण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वीच या रोड लोकार्पण करण्यात आले आहे. पण या बोगद्यामध्ये गळती होत असल्याचे दिसत आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins

Coastal Road Tunnel: मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडवरून (Coastal Road Tunnel) राज्य सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. तीन महिन्यांपूर्वीच मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाची एक बाजू प्रवाशांसाठी खुली करण्यात आली होती आणि केवळ तीन महिन्यांतच या मार्गाच्या बोगद्यामध्ये गळती होऊ लागली आहे. यातच मुंबईमध्ये 10 जून ते 11 जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मुंबई कोस्टल रोड पावसाळ्यामध्ये प्रवाशांकरिता कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन 11 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले होते.

समुद्रखाली बांधण्यात आलेला हा देशातील पहिलाच मार्ग आहे. पूर्वी मुंबईकरांना वरळीहून मरीन ड्राइव्हकडे पोहोचण्यासाठी 40 मिनिटांचा कालावधी लागत असे. आता मुंबई कोस्टल रोडचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवासी अवघ्या 9 ते 10 मिनिटांमध्ये हे ठिकाण गाठत आहेत. पण पावसाळा सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी कोस्टल रोड बोगद्यातून गळती सुरू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.  

(नक्की वाचा: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न स्वप्नच राहणार?; पहिल्या तिमाहीतील टेन्शन वाढवणारी आकडेवारी)

भीतींमधून गळती, अनेक ठिकाणी दिसताहेत काळे डाग

कोस्टल रोड प्रकल्पाच्या एका बाजूचे लोकार्पण करून तीन महिन्यांचाही कालावधी पूर्ण झालेला नाही आणि गळती होऊ लागली आहे. गळतीमुळे भिंतींवर काळे डाग पडले आहेत. रविवारी (26 मे 2024) सकाळपासून गळती सुरू असल्याचे म्हटले जात आहे. बोगद्यामध्ये होणारी गळती नेमकी कोणत्या कारणांमुळे होत आहे? यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी केली कोस्टल रोडची पाहणी

येत्या काही दिवसांमध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये गळती होत असल्याची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बोगद्याची पाहणी करून उत्तम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम केले जाईल आणि पावसाळ्यामध्ये येथे पाणी दिसणार नाही, अशी खात्रीही दिली. 

Advertisement

(नक्की वाचा: पश्चिम रेल्वे 13 तासांनंतरही विस्कळीत, वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू)

प्रवाशांना अडचण होणार नाही - CM शिंदे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "बोगद्यामध्ये गळती होत असल्याची माहिती समजताच मी तातडीने आयुक्तांना फोन केला. दोन-तीन ठिकाणी गळती होत आहे, याची चौकशी केली जाईल. मी तज्ज्ञांचीही भेट घेतलीय. बोगद्याच्या मूळ संरचनेला कोणताही धोका नाही. विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून गळतीचे ठिकाण दुरुस्त केले जाईल. कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. प्रवाशांना कोणतीही अडचण होणार नाही आणि पावसाळ्यात येथे पाणी दिसणार नाही".

Advertisement

(नक्की वाचा: एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वेचे मोठे पाऊल)

समुद्रसपाटीपासून 17 ते 20 मीटर खोलवर आहे हा बोगदा 

10 एप्रिल रोजी हाजी अली परिसरात कोस्टल रोडच्या भुयारामध्ये पाणी शिरले होते. यावरूनही मुंबई मनपावर बरीच टीका करण्यात आली होती. त्यामुळे पावसाळ्यामध्ये कोस्टल रोडवरील प्रवास नागरिकांसाठी कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान, 12.19 मीटर व्यासाच्या मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यातून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. 11 मार्च रोजी एकेरी वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला असून आतापर्यंत 7 लाखांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे.

Advertisement

Mumbai Coastal Road Leak | पावसाळ्याआधीच कोस्टला रोडला गळती ? पाहणीसाठी शिंदे दाखल 

Topics mentioned in this article