Pune News : अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांची पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (GIPE) च्या कुलपती पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. आता दोन दिवसांनंतर सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (SIS) ने हा आदेश मागे घेतला आहे. पुन्हा यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, संजीव सन्याल कुलपती पदावर कायम असतील असं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सन्याल यांना शैक्षणिक दर्जा घसरल्याचं कारण देत गुरुवारी पदावरून हटवण्यात आलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजीव सन्याल यांनी याप्रकरणी मौन सोडलं आहे. ते म्हणाले, पुण्यातील गोखले संस्थेची मूळ संस्था एसआयएसने सांगितलेली एनएएसी मान्यता ते कार्यालयात नसतानाच्या कालावधीतील डेटावर आधारित होती.
नक्की वाचा - Amit Gorkhe News: 'खोटारडेपणाचा निषेध...', मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आमदार अमित गोरखेंचा संताप
SIS ने लावले आरोप
नॅकमध्ये गोखले संस्थेला वाईट ग्रेड मिळाला आहे. जीआयपीईची मूळ संस्था सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने सन्याल यांना पदावरुन हटवलं होतं. एसआयएसने या निर्णयामागे शैक्षणिक दर्जा घसरणे आणि परिस्थितीत सुधारणा घडविण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं होतं. याशिवाय यंदा नॅककडून गोखले संस्थेला बी ग्रेड मिळाली आहे. सन्याल यांच्या हेदेखील कारण देण्यात आलं होतं.