Shahapur News : शहापूर-मुरबाडचा संपर्क तुटला; काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क बंद

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शहापूर-मुरबाड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Shahapur News : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शहापूर-मुरबाड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. काळू नदीला पूर आल्याने चिखले आणि अंबर्जे गावाजवळील महत्त्वाचा पूल पाण्याखाली गेला आहे.

शहापूर आणि मुरबाडला जोडणारा हा पूल सध्या पूर्णपणे पाण्याखाली आहे. परिणामी मुरबाड-वाशिंद मार्गावरील रहदारी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीची पाणी पातळी अजूनही वाढत आहे. नदीच्या दोन्ही तिरावर नागरीक पाणी ओसरण्याची वाट पहात आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Amitabh Bachchan : 'खेळ संपला...'; अमिताभ बच्चनच्या ट्विटमुळे चाहत्यांमध्ये खळबळ, बिग बींना नेमकं काय झालंय?

या पुलावरून ये-जा करणाऱ्या जवळपास 10 ते 15 गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. शाळा, दवाखाना आणि बाजारपेठेसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना या रस्त्याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. पाणी ओसरल्यानंतरच पूल सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.