शरद पवारांच्या खेळीने आंबेगावातील सत्तापालट होणार? गुरू विरुद्ध शिष्य रंगलाय सामना!

बेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी मंचरमधल्या सभेत त्यांचे शिष्य अशी ओळख असणाऱ्या दिलीप वळसे पाटलांचा पराभव करा असे म्हणत राज्यातल्या सगळ्याच गद्दार उमेदवारांना इशारा दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
शिरूर:

अविनाश पवार, प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीत अनेक समीकरणं बदलताना दिसत आहे. एकेकाळी एकाच पक्षात असलेले सहकारी विरोधात जाऊन उभे राहत आहेत. त्यामुळे प्राथमिक वरवर दिसणाऱ्या या निवडणुकीचे पडसाद लांबपर्यंत पडू शकतात. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांनी मंचरमधल्या सभेत त्यांचे शिष्य अशी ओळख असणाऱ्या दिलीप वळसे पाटलांचा पराभव करा असे म्हणत राज्यातल्या सगळ्याच गद्दार उमेदवारांना इशारा दिला आहे. आता इथली जनता काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नक्की वाचा - शरद पवारांनी जाहीर केली मुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका, उद्धव ठाकरेंचे टेन्शन का वाढले?

एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात वेळा निवडून आले दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांचे गुरू म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे  दिलीप वळसे पाटील यांचे वडील गोविंदराव वळसे पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक.  

Advertisement

त्यांनी देखील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांचा मुलगा दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे पीए म्हणून वर्णी लागली. त्यांच्यासोबत राजकारणाचे धडे घेऊन ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघात उतरले आणि इथे त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केलं. या बळावर त्यांनी अनेक मंत्रिपद ही भूषवले. मात्र आता राज्याच्या राजकारणामध्ये एक ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची साथ दिली. यासाठी ते आंबेगाव तालुक्यात असणार डिंभे धरण हे कारण सांगतात. या धरणाचं पाणी बोगदा पाडून कर्जत जामखेडला नेणार असल्याने ही वेगळी भूमिका घेतली असे ते वारंवार सांगत आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​'गद्दारी केली, आता सुट्टी नाही', दिलीप वळसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गरजले!

दुसरीकडे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांचे शिष्य असलेले देवदत्त निकम यांनी शरद पवार यांची साथ दिली. देवदत्त निकम हे नागापूर गावचे सरपंच ते लोकसभेचे उमेदवार असा प्रवास आहे. या दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना भीमाशंकर कारखान्याचा अध्यक्ष केले. त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे सभापती देखील केले. याच बाजार समितीमध्ये देवदत्त निकम यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि आता ते आंबेगाव विधानसभेच्या मैदानात थेट गुरुंच्याविरोधात बंडाचे निशाण घेऊन उतरले आहेत. अर्थात त्यांना साथ मिळाली आहे ती शरद पवारांची. शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांचे गुरू. तर दुसरीकडे देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे शिष्य. अशा या गुरु शिष्याच्या सामन्यामध्ये आता काय निर्णय होणार याकडे केवळ आंबेगावचेच नाही तर राज्याचे लक्ष लागले आहे. कारण हा सामना शरद पवार विरुद्ध दिलीप वळसे पाटील असाच सध्यातरी दिसून येतो आहे. त्यामुळेच मंचर येथील सभेत शरद पवार यांनी थेट वळसे पाटलांच्या पराभवासाठी जनतेला साद दिली आहे. 

Advertisement

राज्यामध्ये मागील काळामध्ये एकीकडे शिवसेनेमध्ये फूट पडली तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये. अशा पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता जनता काय कौल देते, यावर पुढील राजकारण अवलंबून आहे. शरद पवार यांनी गद्दारांना गाडा असाच नारा दिला आहे. याचा परिणाम कितपत होतो हे आपल्याला मतदानातून समजणारच आहे.