Sharad Pawar Health Update : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल समोर येत आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने सत्ता राखली आहे. अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना विमान अपघात झाला आणि बारामतीत त्यांचं निधन झालं. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाने प्रचार करणं टाळलं होतं.
दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. सध्या रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शरद पवारांची नेमकं काय झालंय?
रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल.
आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना अॅडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ."
रुग्णालयात त्यांची मुलगी आणि एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे उपस्थित आहेत.