Sharad Pawar Speech : महिलांच्या सैन्यभरतीचा प्रस्ताव मी ठेवला होता : शरद पवार

संरक्षणमंत्री असताना शरद पवारांनी सैन्यदलात महिलांच्या समावेशाबाबत मी प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यावेळी तिन्ही दलाच्या प्रमुखांनी याला नकार दिला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल तपासे, सातारा

Sharad Pawar Speech : विंग कमांडर व्योमिका सिंह आणि लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला लष्कर अधिकाऱ्यांना आज अवघा देश ओळखत आहे. ऑपरेशन सिंदूरबाबतची सविस्तर माहिती त्या मीडियाच्या माध्यमातून देशाला ते आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी लष्करातील परिस्थिती अशी नव्हती. शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

संरक्षणमंत्री असताना सैन्यदलात महिलांच्या समावेशाबाबत मी प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यावेळी तिन्ही दलाच्या प्रमुखांनी याला नकार दिला होता. तरीदेखील विरोध झुगारुन मी महिलांना सैन्यात भरती करण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार यांनी सांगितलं. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  

(नक्की वाचा - India Pakistan News : भारताच्या सीमा भागात रात्रीच्या अंधारात काय घडलं? भारतीय सैन्याने शेअर केला Video)

शरद पवारांनी म्हटलं की, संरक्षणमंत्री असताना सैन्य दलाच्या बैठकीत मी सुचवलं की, जगातील अनेक देशांमध्ये लष्करात मुली महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मग आपण हा निर्णय का घ्यायचा नाही. मात्र तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांना मला सांगितलं की हे शक्य नाही. महिलांना हे झेपवणार नाही, कठीण काम आहे. मी त्यांना विचार करुन पुढच्या मिटिंगमध्ये सांगा असं सांगितलं. 

(नक्की वाचा : तणावाचे रुपांतर आण्विक युद्धात होऊ नये अशी आशा! चर्चेद्वारे वाद मिटवण्याचा अमेरिकेचा सल्ला)

पुढच्या मिटिंगमध्ये या तिघांनीही नाही म्हणून सांगितलं. त्यानंतरच्या मिटिंमध्येही तिन्ही दलाच्या प्रमुखांनी नाही म्हटलं. अखेर मला सांगावं लागला की देशातील जनतेने संरक्षणविषयक निर्णय घेण्याचा अधिकार मला दिला आहे. त्यामुळे भारताच्या सैन्यात इथून पुढे मुलीदेखील असतील आणि त्यांना संधी द्यायची, असं मी सांगितलं. त्यामुळे आज आपण बघतोय भारत-पाकिस्तान सीमेवर जे काही घडतंय त्यासंबंधीची सविस्तर माहिती आपल्या दोन भगिनी संपूर्ण देशवासियांना देत आहेत. 

Advertisement

Topics mentioned in this article