राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर या सगळ्या प्रक्रियेला खीळ बसला. या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू हे अजित पवार होते आणि आज तेच हयात नसल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र येणार की नाही याबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. ही चर्चा थंडावलेली असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी त्यांचा निर्णय पक्का केला आहे.
कार्यकर्त्यांचे ठरले नेत्यांचे काय?
अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या हाती आली आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोन नेत्यांबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधीस नेत्यांचे फारसे चांगले मत नाही. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यात हा सगळ्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पक्षबांधणी अधिक मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबद्दल आपली मते स्पष्टपणे मांडली. या कार्यकर्त्यांनी म्हटले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्हाला अडचण नाही मात्र आता अजित दादा हयात नसल्याने त्या पक्षात काही शिल्लक राहिले नाही.
Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction.
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 2, 2026
Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all.
Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate…
सुनेत्रा पवारांचा दौरा; तटकरे, पटेलांना दूर ठेवले ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी संसदेत जाऊन काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. खासदार सुधा मूर्ती यांना भेटल्यानंतर त्यांनी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. अर्थमंत्र्यांनी अजित पवारांच्या निधाबद्दल शोक व्यक्त करत सुनेत्रा पवारांचे सांत्वन केले. या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार एकट्या दिसून आल्या. त्यांच्यासोबत ना सुनील तटकरे दिसले ना प्रफुल पटेल. यावरूनही चर्चांना उधाण आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world