संकेत कुलकर्णी, पंढरपूर
सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटारे दिपक साळुंखे यांना उमेदवारी दिली. तर शेकापने देखील बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. असे जरी असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी दीपक साळुंखे यांच्यासोबत प्रचारात सक्रिय आहेत. तर शेकापची एकला चलो रे...ची भूमिका दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीत सांगोल्याच्या जागेवरून बरीच खलबतं घडली. 2019 सालचा विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने उद्धव ठाकरे गटाने सांगोल्याच्या जागेवर दावा केला. तर पारंपारिक जागा शेकापची असल्याने शरद पवारांकडे शेकाप नेत्यांनी जागा राखण्यासाठी तगादा लावला.
( नक्की वाचा : अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड )
मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी जागेवर हक्क दाखवला. दिपक साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत याबाबत तोडगा निघेल असे बोलले जात होते. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र स्पष्ट झाले.
एकीकडे महाविकास आघाडीतील दोन उमेदवार संगोल्याच्या रिंगणात आहेत. मात्र असे जरी असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुक्यातील सर्व नेते दिपक साळुंखे यांच्यासोबत प्रचारात सक्रिय असताना दिसत आहेत. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीत घटक पक्षांना सामावून घेण्यात आता दीपक साळुंखे यांनी बाजी मारली आहे.
(नक्की वाचा- "...तर महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही", फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे काय म्हणाले?)
तर शेतकरी कामगार पक्ष आपल्या पारंपारिक कार्यकर्त्यांसोबत ही निवडणूक लढणार असल्याचे बोलले जाते. शेकापने आपले कार्यकर्ते पदाधिकारी, मित्र पक्षांचे पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.