Shirdi News: साईंच्या शिर्डीतून पेढे गायब, कारण समोर येताच भाविक शॉकमध्ये, प्रसाद म्हणून केली जात होती विक्री

पेढा प्रसादावरून शिर्डीत वाद ही निर्माण झाला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • शिर्डीतील प्रसादासाठी प्रसिद्ध असलेले पेढे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे विक्रीसाठी उपलब्ध नाहीत
  • अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट दर्जाचे आणि खराब झालेले पेढे विक्रीत आढळल्यामुळे सर्वत्र बंदी घातली आहे
  • निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमध्ये साखर जास्त प्रमाणात असून उन्हामुळे ते खराब होत आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
शिर्डी:

सुनिल दवंगे

साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक शिर्डीत येत असतात. साईंचे दर्शन घेतल्यानंतर भाविक प्रसाद म्हणून हमखास पेढे विकत घेताल. तेच पेढे ते प्रसाद म्हणून आपल्या नातेवाईकांना मित्रांना वाटत असतात. त्यामुळे या पेढ्यांना शिर्डीत सर्वाधिक मागणी होती. पण आता हेच पेढे शिर्डीतून गायब झाले आहेत. त्या मागचे कारण ही भयंकर आहे. ते कारण समजल्यानंतर भाविकांना तर शॉक बसल्या सारखं झालं आहे. सध्या शिर्डीतल्या सर्वच प्रसाद विक्रेत्यांनी आपल्या स्टॉलवरून हे पेढे विकण्याचं टाळलं आहे. सध्या एकाही दुकानात तुम्हाला पेढे मिळणार नाहीत अशी स्थिती आहे.  

तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार स्विकारल्यानंतर धडक कारवाई सुरू केली आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ नको अशी थेट भूमीका त्यांनी घेतली आहे. यावरून अन्न व औषध प्रशासनाकडे शिर्डीत निकृष्ट दर्जाचे पेढे विकले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यात हे पेढे वाईट पद्धतीचे असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यावर बंदी आणि जप्ती आणली गेली. या निकृष्ट दर्जाच्या पेढा प्रसादावरून शिर्डीत वाद ही निर्माण झाला होता. एफडीएच्या कारवाईनंतर तर हा पेढा शिर्डीतूनच हद्दपार झाला आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Mega project: सर्वात मोठा बोगदा! 40 मिनिटांचा प्रवास फक्त 5 मिनिटात, 'या' शहरासाठी ठरणार गेमचेंजर प्रकल्प

शिर्डीच्या बाजारपेठेत आता मोठे बदल दिसून येत आहेत. दोनशे ग्रॅमच्या पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढ्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली. धाडी टाकल्या. या कारवाईनंतर अनेक व्यावसायिकांनी संशयित पेढ्यांचा साठा विक्रीतून काढून टाकल्याचे सांगितले. तर काहींनी थेट पेढे फेकून दिल्याचे ही सांगितले आहे. परिणामी, वादाच्या केंद्रस्थानी असलेला पेढा प्रसाद अनेक दुकानांतून अचानक गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र यामुळे भाविकांना चांगलाच शॉक लागला आहे. इतके दिवस जो प्रसाद म्हणून घेत होतो तो निकृष्ट दर्जाचा होता हे त्यांना समजले आहे. 

नक्की वाचा - Bhiwandi News: सहाय्यक आयुक्तालाच लाच घेताना रंगेहात पकडले, लाचेची रक्कम पाहून डोळे होतील पांढरे

या पेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर होती. उन्हा मुळे ते खराब ही होत होते. अनेक पेढ्यांना बुरशी लागल्याचं ही समोर आलं होतं. त्यानंतर विक्रेत्यांनी ते पेढे परत केल्याचे ही काही जण सांगतात. 200 ग्रॅमची ही पॅकेट विकली जात होती. 200 रूपयांना जागेवर हे पेढे मिळत. विक्रेते हे पॅकेड भाविकांना 300 रूपयांना विकत होते. पण हा प्रसाद त्यांच्यासाठीच किती घातक होता हे आता समोर आले आहे. या पेढ्याच्या अनेक तक्रारी होत्या असं ही काही दुकानदार सांगत आहे. आता अन्न आणि औषध प्रशासनाचा पुढील आदेश येत नाही तोपर्यंत पेढे विकणार नाही अशी भूमीका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी शिर्डी पेढ्याचा प्रसाद मिळणार नाही हे स्पष्ट आहे.