सुनील दवंगे, शिर्डी
Shirdi Crime News : युनायटेड किंग्डम (UK) येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्त कुटुंबाची शिर्डीत फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा साहित्याच्या नावाखाली या कुटुंबाची तब्बल 4 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणी फसवणूक झालेल्या कुटुंबाने शिर्डी पोलीस ठण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत संबधित प्रकरणात मुळ जागा मालकाला देखील आरोपी केले आहे. त्यामुळे शिर्डीत फसवणूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)
मूळ पंजाब येथील आणि व्यवसायानिमित्त युनायटेड किंग्डम येथे स्थायिक असलेले एक साई भक्त कुटुंब आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलिशी एजंटने हारफुल प्रसाद दुकानात घेऊन जात 500 रुपये किमतीचे पूजाचे साहित्य 4 हजार रुपयांना जबरदस्तीने दिलं.
(नक्की वाचा- Explainer: दिल्लीला वारंवार भूकंपाचा धोका का आहे? काय आहे कारण?)
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी शिर्डी पोलिसांत संबंधित दुकानादाराविरोधात फिर्याद दाखल केली आहे. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 318 (4) नुसार गुन्हा नोंदवला असून यात फुल भांडार दुकान मुळ जागा मालक, चालक आणि कमिशन एजंट या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.