Dussehra Melava 2025 : शिंदे-ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ धडाडणार!राज्यात उद्या होणार 5 दसरा मेळावे, कुठे पाहाल?

Shivsena Dussehra Melava 2025 : महाराष्ट्रात राजकारणाची दिशा बदलण्यासाठी आणि विविधा राजकीय योजना आखण्यासाठी  बड्या नेत्यांकडून दसरा मेळाव्यांचं आयोजन केलं जातं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dussehra Melava 2025
मुंबई:

Shivsena Dussehra Melava 2025 : महाराष्ट्रात राजकारणाची दिशा बदलण्यासाठी आणि विविध राजकीय योजना आखण्यासाठी बड्या नेत्यांकडून दसरा मेळाव्यांचं आयोजन केलं जातं. एकेकाळी दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची अन् तमाम शिवसैनिकांच्या मनगटात हिंदूत्वाची ताकद निर्माण व्हायची. पण बाळासाहेबांचं निधन झालं आणि काही वर्षानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यामुळे शिवसेनेचे आता दोन दसरा मेळावे होतात. उद्या 2 ऑक्टोबर रोजी राज्यात 5 दसरा मेळावे होणार आहेत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तर उद्धव ठाकरे (UBT) शिवसेनेसाठी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेणार आहेत. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसऱ्या मेळाव्याचा गजर वाजणार आहे. याचसोबत नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे भगवानगडावर दसरा मेळावा घेणार आहेत. तर मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळाव्यात त्यांच्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत.

यंदाचा शिवेसना (UBT) चा दसरा मेळावा विशेष असणार

शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे शिवेसना यूबीटी गटाला पक्ष मजबुतीसाठी नवनवीन राजकीय योजना आखाव्या लागल्या. मागील काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं कुटुंब वेगवेगळ्या कौंटुबीक कार्यक्रमात एकत्र दिसले.त्यामुळे उद्धव आणि राज एकत्र येतील आणि शिवसेना-मनसेची युती जाहीर करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

दोन महिन्यांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापलं होतं. त्यानंतर मराठीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. पण त्यांनी पक्षाच्या युतीबाबत अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान, उद्या 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील आणि कार्यकर्त्यांना संबोधीत करतील, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा दसरा मेळावा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 

Advertisement

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शिवसैनिकांना दसरा मेळाव्यात संबोधीत करतात. शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार होता. परंतु, या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले असून आता शिंदेंचा दसरा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगडावर होणार आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे भगवान गडावर भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत. 

उद्याचे दसरा मेळावे कुठे पाहाल?

उद्या 2 ऑक्टोबर रोजी होणरे पाचही दसरा मेळावे तुम्ही NDTV मराठी चॅनेलसह वेबसाईट आणि यूट्यूबवर लाईव्ह पाहू शकता.