संकेत कुलकर्णी, पंढरपूर
लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेने निवडून दिले नाही. पाणी आडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठवले. ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे. याबद्दल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वतःला थोबाडीत मारून घेतली. सांगोला मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्याचे शल्य आजही माजी आमदार शहाजी पाटील यांच्या मनात असल्याचे दिसते. याच बाबत पाणी प्रश्नावर शहाजी बापूंनी स्वतःला थोबाडीत मारून घेतली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगोला मतदारसंघाला आजपर्यंत कुणी दिला नाही इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असतानाही मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे आपण भाजपचे उपकार कधी विसरणार नाही. आपले संपूर्ण आयुष्य भाजपसाठी तळमळ करत राहील, असे विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.
सांगोला तालुक्यातील येणाऱ्या उजनीतील पाणी प्रश्नाबाबत आपण यापूर्वीही बोललो आहे. पाणी कुणी अडवलं कोणी घेतलं. हे जाहीर सांगितला आहे. आता मात्र मी जाहीर सांगणार नाही. कारण त्यांच्याकडे अर्थ खात आहे. माझी अडचण कोणी करू नका, असे म्हणत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता. उजनीचे पाणी बारामतीला जात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.
नक्की वाचा - Waqf Bill: 'वक्फची जमीन सोडा, चीनने किती जमीन हडप केली सांगा' अखिलेश यादव भडकले
सांगोला येथे सर्वपक्षीय संघटनांकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली.