जाहिरात

Shivsena Melava: 'फितुरांनो याद राखा...', बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातून एकनाथ शिंदे, भाजपला इशारा!

Nashik Balasaheb Thackeray AI Speech: यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणातून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह भाजपवर सडकून टीका केली. 

Shivsena Melava: 'फितुरांनो याद राखा...', बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातून एकनाथ शिंदे, भाजपला इशारा!

Shivsena Nirdhar Shibir Nashik: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा नव्याने मैदानात उतरली आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे निर्धार शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण.. आज नाशिकमध्ये या निर्धार शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणातून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह भाजपवर सडकून टीका केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे?

'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, आज तुफान गर्दी दिसतेय.नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. कारण नाशिक आणि शिवसेनेचे जुने नाते आहे ते राहणारच. म्हणजे ते नरेंद्र मोदी म्हणतात तसं हे नातं नाही. नाशिक से मेरा पुराना नाता है, मै यहा वीर सावरकर के साथ काम करता था, और जॅक्सन के हत्या में था. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग.. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा... असं या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत. 

भाजपवर टीका..

"महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवले. पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्ष आमचे त्यांचे नाते होते. महाराष्ट्रात ते शिवसेनेमुळेच वाढले. मग नातं तोडंल कोणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू एकएक काढतो. त्यातच मजा असते हो नाहीतर खेळ आटपून जाईल. बरं तो आपला बबन घोलप कुठे आहे. अरे कुठे भरकरटताय इकडे तिकडे.. अरे बाबांनो शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात. हा साधा शिवसैनिक बसलाय ना तो महत्त्वाचा आहे. त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं.. असेही ते पुढे म्हणालेत. 

( नक्की वाचा : Bengal Violence : '... म्हणून बंगालमध्ये दंगल घडवली जात आहे', मिथुन चक्रवर्तींचा थेट हल्ला )

शिंदे गटालाही टोला..

"बातम्या सुरुच आहेत, हा गेला तो गेला. अरे अस्वलाच्या अंगावरील थोडे केस उपटले म्हणून काय फरक पडतो? आता ही सगळी नवी मंडळी आली.. पण नाशिकचे मैदान गाजवले आहे.. पैसे देऊन माणसं आणण्याचा दळभद्रीपणा कधीच करावा लागला नाही, तेवढी कृपा आमच्यावर आई जगदंबेची आहे. आत्ता झालेल्या निवडणुकीत काय झालं? हा निकाल तुम्हाला मान्य आहे का? भाजप आणि नकली शिवसेना वाल्यांनी असे काय दिवे लावले? म्हणून असा निकाल लागला. लोकशाहीत असे जबरदस्तीने निकाल लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य अन् कसले काय? हे जर असेच सुरु राहणार असेल तर आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावेच लागेल.. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

"भारताला इंग्रजांनी जेवढे लुटले नाही तेवढे या भाजपने लुटले, फक्त हिंदूत्वाच्या नावाखाली. भाजपला हिंदूत्वासाठी आम्ही सोबत घेतले होते मोठे केले पण आज हिंदूत्वाचे खरे मारेकरी तेच आहेत. हिंदूत्व ही तुमची खासगी मालमत्ता नाही. जातीजातीत भांडणे लावून नाना फडणवीस मजा बघत आहेत. पण एक सांगतो तुमचे 100 बाप खाली आले तरी शिवसेना संपणार नाही. जे गेले ते गेले, त्यांची लाकडे भाजपवालेच रचतील... असा हल्लाबोलही त्यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - Political news: पुण्यात कार्यक्रम, फडणवीस- शिंदेंना निमंत्रण, अजित पवारांना मात्र नो एन्ट्री

दरम्यान, महाराष्ट्राचे हे चित्र असेच बघणार असाल  तर छत्रपती शिवरायांचे नाव घेऊ नका अन् जय भवानी जय शिवाजीही म्हणू नका. निष्ठावंत म्हणून घेणारेच गद्दार अन् फितूर निघाले.  गद्दार गेले ते गेले. त्यांना पैसा, अडका, सत्ता आज मिळाल्यात. पण इतिहासात तुमची नोंद फितूर अन् महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार. या गद्दारांनी जिवंतपणीही पाठीवर वार केलेच मृत्यूनंतरही घाव घालणे सुरुच आहे. मात्र याद राखा गद्दारांनो, तुमचे हे नीच मनसुबे पूर्ण होणार नाहीत. निष्ठेच्या वणव्यात फितुरीची राखरांगोळी होईल, माझा महाराष्ट्र फितूरीचा बदला घेईल.. असेही यामध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: