थेट उपमुख्यमंत्रिपद, किमान गृह अन् वित्त तरी... केसरकरांच्या गाऱ्हाण्याचा Video होतोय व्हायरल

मुख्यमंत्रिपदाची चर्चा संपल्यानंतर आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणाच्या नेत्याच्या पदरी कोणतं मंत्रिपद पडणार यावर अद्यापही चर्चा सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आज 5 डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आला. या सरकारमध्ये दोन मुख्यमंत्री असतील. यातील एक उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे त्यांनीच भर पत्रकार परिषदेत जाहीर केलं. मात्र अद्यापही दुसरा उपमुख्यमंत्री कोण असेल याबाबत निश्चित कळू शकलेलं नाही. सद्यपरिस्थितीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदावर असतील अशी सूत्रांची माहिती आहे. 

नक्की वाचा - फडणवीस- पवारांचं ठरलं, एकनाथ शिंदेंचे मात्र तळ्यात-मळ्यात

मुख्यमंत्रिपदाची चर्चा संपल्यानंतर आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणाच्या नेत्याच्या पदरी कोणतं मंत्रिपद पडणार यावर अद्यापही चर्चा सुरू आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी शपथविधी होण्याचं निश्चित झाली असताना मंत्रिपदासाठी नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 

Advertisement

वरिष्ठ नेत्यांच्या कार्यालयाच्या खेटा घालण्याशिवाय देवाच्या चरणी गाराणं घातलं जात आहे. शिंदे गटातील मोठे नेते आणि शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे दीपक केसरकरदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. शालेय मंत्रिपद दिल्यानंतर दीपक केसरकर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून ते या पदावर काम करीत आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - एकनाथ शिंदेंना नेमकं हवंय तरी काय? जवळच्या नेत्याने बोलता बोलता सांगून टाकलं

दीपक केसरकर हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी हे गाऱ्हाणे घालण्यात आले. मंत्री होण्यासाठी फक्त नेत्यांकडे लॉबिंग करून भागत नाही तर त्यासाठी देवी देवतांचा आशीर्वाद ही तेवढाच गरजेचा असल्याचं हा व्हिडिओ दाखवून देतो. गाऱ्हाणं घालताना उपमुख्यमंत्रिपद, वित्तमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा उल्लेख आहे. आता केसरकरांच्या गाऱ्याण्यानंतर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री नाही तर निदान कुठलं खात मिळत हे पाहण औत्सुक्याचे बनले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे दीपक केसरकर यांनी राज्यमंत्री वित्त आणि नियोजन, गृह (ग्रामीण) आणि पालकमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. त्यांनी राज्यातील सर्व नगराध्यक्ष आणि नगरपरिषदांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघ या शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.   

Advertisement

राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण याची चर्चा जोरात सुरू असतानाच सिंधुदुर्गात मात्र एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा हा  व्हिडिओ असून ज्या मंत्रिपदांसाठी राज्याच्या राजकारणात महायुतीत तिढा सुरू आहे, ती पदे आपल्याला मिळावी यासाठी सावंतवाडीचे ग्रामदैवत पाटेश्र्वर देवाला गाऱ्हाणे घालतानाचा हा व्हिडिओ आहे. शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि सत्तरीजवळ पोहोचलेल्या केसरकरांना यंदा मंत्रिपद मिळणार का, हे उद्या ५ डिसेंबरला स्पष्ट होईल.