
रेवती हिंगवे, पुणे: राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरुन बेपत्ता झाला असून त्याचे अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र याबाबत आता स्वत: तानाजी सावंत यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण देत मुलगा सुखरुप असल्याचे म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ऋतुराज तानाजी सावंत (वय 35) असे त्याचे नाव असून तो पुणे विमानतळावर आला होता. याबाबत पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरातून स्विफ्ट गाडीतून त्याचे अपहरण करण्यात आले अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र कौटुंबिक वादातून तो स्वतःच परदेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच स्वतः तानाजी सावंत यांनी आपला मुलगा सुखरुप असल्याचे म्हटले आहे.
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
याबाबत आमदार तानाजी सावंत यांनी महत्त्वाचा खुलासा केला. माझा मुलगा ऋतुराज कधीही न सांगता घराबाहेर पडत नाही. मात्र तो काहीही न कळवता थेट विमानतळावरुन बाहेर गेल्याने काळजी वाटली आणि मी किडनॅपिंगची तक्रार दिली. मात्र त्याच्यासोबत त्याचेच दोन मित्र आहेत. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world