Sindhudurg News: भाजप विरुद्ध सेना संघर्ष पेटला! मध्यरात्री निलेश राणेंचा पोलिस स्टेशनमध्ये राडा

पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुरु दळवी, सिंधुदुर्ग:

Sindhudurg Malvan Election 2025: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर पैसे वाटपाचा आरोप केला आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? 

मालवण पोलिसांनी सदर वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलीस ठाणे इथे आणले. यावेळी मालवण येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब व अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात आले. सदर प्रकरण मिटविण्यासाठी भाजप नेते हस्तक्षेप करत असल्याचे समजताच आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले.

Pune News: भरधाव बस फुटपाथवर चढली, सख्ख्या भावा बहिणींना चिरडले, चिमुकल्यांसाठी कुटुंबीयांचा आक्रोश

त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण तंग झाले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवणकरांनो,  प्रश्न गंभीर आहेत! कोणाचा दबाव? कोणाचं रक्षण? पैशांनी निवडणूक वाकवण्याचा कोणाचा प्रयत्न? असे सवाल निलेश राणेंनी केले आहेत.

निलेश राणेंचा संताप!

देवगड येथील BJP कार्यकर्त्याची गाडी ही देवगड येथील असून BJP देवगड तालुकाध्यक्ष महेश विश्राम नारकर व कृष्णकांत आडिवरेकर पैसे वाटताना भेटले. नाकाबंदीमध्ये पोलिसांनी ही गाडी जप्त केली. गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळली. ही गाडी भरून पैसा कुठे जात होता? कोणासाठी जात होता? हा थेट प्रश्न निलेश राणेंनी पोलिसांसमोर उपस्थित केला.

Advertisement

धक्कादायक बाब म्हणजे पोलिस कारवाईनंतर भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब यांनी “हे पैसे तुम्ही ठेवा, आणि माझ्या माणसांना सोडा… त्यांना घरी जाऊ द्या' अशी मागणी केल्याचाही दावा राणेंनी केला आहे.  म्हणजे पैसा वेगळा, लोक वेगळे, आणि कारवाई थांबवण्याची मागणी वेगळी! असे म्हणत पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचेही निलेश राणेंनी म्हटलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Rinku Rajguru: सैराटची 'आर्ची' थेट निवडणुकीच्या प्रचारात, कुणासाठी मतं मागितली माहित आहे का?