Sindhudurg Accident : गणेशभक्तांच्या बसला अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक

मुंबईहून कोकणात गणेशोत्सवानिमित्त येणारे काहीजण जखमी झाले आहेत. तर सह दोन्ही बसचे चालक-वाहक देखील जखमी झाले आहेत. एका गणेशभक्ताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग

गणेशोत्सवानिमित्त गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सिंधुदुर्गात दोन एसटी बसची समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास तळेरे ते विजयदुर्ग मार्गावर ही घटना घडली आहे. अपघातात 18 ते 20 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग-पणजी आणि इचलकरंजी-विजयदुर्ग दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. विजयदुर्ग बसमधून मुंबईहून आलेले चाकरमानी होते. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झाले आहे.  

(नक्की वाचा - मुलुंडमध्ये हिट अँड रन, BMW कारने दोन गणेशभक्तांना उडवलं, एकाचा मृत्यू)

मुंबईहून कोकणात गणेशोत्सवानिमित्त येणारे काहीजण यामध्ये जखमी झाले आहेत. तर दोन्ही बसचे चालक-वाहक देखील जखमी झाले आहेत.  बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. एका गणेशभक्ताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातातील 10 जखमींना कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर यातील 9 जण गंभीर असल्याने त्या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात ज्या हद्दीत घडला त्या हद्दीतील पोलीस पथक व कणकवली पोलीस यांच्या सहाय्याने अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

Topics mentioned in this article