जाहिरात

Sindhudurg News: 'सिंधुदुर्गचं नुकसानच आहे..'शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या नकाशावरून माजी आमदाराचा खळबळजनक दावा

Sindhudurg News: शक्तीपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि व्यापाराचे मोठे नुकसान होईल, असा दावा माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

Sindhudurg News: 'सिंधुदुर्गचं नुकसानच आहे..'शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या नकाशावरून माजी आमदाराचा खळबळजनक दावा
"Shaktipeeth Highway Sindhudurg: शक्तीपीठ महामार्गाबाबत माजी आमदाराचा खळबळजनक दावा"
NDTV Marathi And Canva

- गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी

Sindhudurg News: राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला 'शक्तीपीठ महामार्ग' सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरणार असल्याची टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. या महामार्गाच्या नवीन नकाशामुळे जिल्ह्याचा पर्यटन आणि व्यापारी दृष्टिकोन धोक्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे वैभव नाईक यांचा आक्षेप?

शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आराखड्यानुसार, हा मार्ग राधानगरीपर्यंत येणार असून तिथून तो थेट गोवा-पत्रादेवीपर्यंत पोहोचणार आहे. नाईक यांच्या मते, जर हा महामार्ग पत्रादेवीपासून सुरू झाला तर तो सातारा जिल्ह्यापर्यंत  समांतर मार्ग होईल. यामुळे सातारा ते मुंबई हा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होईल.

(नक्की वाचा: Sion Railway Bridge:सायनकरांसाठी खूशखबर! सायन रेल्वे ब्रीज या तारखेला होणार सुरू? अश्विनी भिडेंनी दिली डेडलाइन)

"पर्यटनावर होणार विपरित परिणाम"

वैभव नाईक यांनी भीती व्यक्त केली आहे की,"मुंबई-गोवा महामार्गावरून सिंधुदुर्गात येणारा पर्यटक आता थेट पत्रादेवी मार्गे गोव्याला जाईल किंवा गोव्याहून येणारा पर्यटक सिंधुदुर्गात न थांबता सरळ साताऱ्याकडे जाऊ शकतात."

(नक्की वाचा: IMD Colour Code Alert Meaning: IMDकडून देण्यात येणाऱ्या Red, Orange, Yellow Alertचा अर्थ काय? जाणून घ्या)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi And Canva

"व्यापारी दृष्टिकोनातून नुकसान"

"मुंबईहून येणारे लोक पत्रादेवीमध्ये येऊ शकतात, त्यामुळे व्यापारीदृष्ट्या या महामार्गाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं नुकसान होणार आहे"असे म्हणत माजी आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com