जाहिरात

Sion Railway Bridge:सायनकरांसाठी खूशखबर! सायन रेल्वे ब्रीज या तारखेला होणार सुरू? अश्विनी भिडेंनी दिली डेडलाइन

Sion Railway Overbridge: महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सायन रेल्वे उड्डाणपूल आणि रस्ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली आणि दिलेल्या डेडलाइनमध्ये कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

Sion Railway Bridge:सायनकरांसाठी खूशखबर! सायन रेल्वे ब्रीज या तारखेला होणार सुरू? अश्विनी भिडेंनी दिली डेडलाइन
"Sion Railway Overbridge: सायन रेल्वे ब्रीज या तारखेला होणार सुरू?"

Sion Railway Overbridge: मुंबईतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सायन (शीव) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम येत्या 15 जुलै 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. गुरुवारी (16 एप्रिल 2026) त्यांनी शहरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यावेळी त्यांनी प्रशासनाला कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या.

अश्विनी भिडेंनी दिली डेडलाइन 

सायन पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या पुलाच्या कामात रेल्वे विभागाकडून पोलादी गर्डर (Girders) टाकण्याच्या कामात 15 दिवसांचा विलंब झाला आहे. नियोजनानुसार हे काम 30 एप्रिलपर्यंत होणे अपेक्षित होते. पण आता ते 15 मेपर्यंत लांबणीवर गेले आहे. हा विलंब इतर कामांतून भरून काढून 31 मेपर्यंत दोन्ही गर्डर बसवाव्यात आणि 15 जुलै 2026 पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण करावे, असे आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केले.

(नक्की वाचा: Heatwave News: सूर्य आग ओकतोय! पुढचे 4 दिवस महत्त्वाचे; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणाला IMDचा इशारा)

पावसाळ्यापूर्वी रस्ते काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे आदेश

मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पांतर्गत आतापर्यंत एकूण 1,736 रस्त्यांचे (496.83 km) काम पूर्ण झाले आहे. सायन परिसरातील रस्त्यांच्या पाहणीदरम्यान आयुक्तांनी कडक नियमावली जाहीर केली आहे:

  1. 30 April 2026: या तारखेनंतर कोणतेही नवीन खोदकाम करू नये.
  2. 15 May 2026: काँक्रिट ओतण्याची सर्व कामे पूर्ण असावी.
  3. 31 May 2026: रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करून ते वाहतुकीस खुले करावे.
शीव (सायन) येथील  रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा 1 आणि टप्पा 1 अंतर्गत दिनांक 13 एप्रिल 2026 अखेर एकूण 1,736 रस्‍त्‍यांचे मिळून 496.83 किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत शहर विभागातील शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांचीही पाहणी श्रीमती भिडे यांनी केली. शीव पूर्व येथे 27 क्रमांकाच्‍या रस्‍त्‍याच्‍या मुख्‍य वाहतुकीच्‍या भागाचे काँक्रिटीकरण काम आणि रस्ता क्रमांक 25 (सी) येथील पदपथ कामाची त्‍यांनी पाहणी केली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com