सौरभ वाघमारे, सोलापूर
Solapur News : १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे, सोलापूर येथे एका घडली आहे. आईच्या मृत्यूच्या नैराश्येतून मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन मामाच्या घरी आत्महत्या केली. शिवशरण भुताळी तळकोटी असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
शिवशरणच्या आईचे तीन महिन्यापूर्वी कावीळ झाल्यामुळे निधन झालं होतं. शिवशरण याला आईच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला होता. शिवशरण याने मरताना आपल्या व्यथा चिठ्ठीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Vasai News : बाराव्या मजल्यावरून पडून 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर)
शिवशरण याला दहावी 92 टक्के मिळाले होते. नीटचा अभ्यास करून त्याला डॉक्टर व्हायचे होते. मात्र कावीळ आजारामुळे आईचं तीन महिन्यापूर्वी निधन झाल्यानंतर शिवशरणला मानसिक धक्का बसला. वडील एका खाजगी संस्थेत कमी मानधनावर काम करत होते, त्यामुळे मामा महादेव तोळनुरे यांनी कोंढवा येथून सोलापुरात कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीसाठी त्याचा प्रवेश घेतला होता. आईच्या जाण्यामुळे मामा आणि आजीकडे बघून शिवशरणने जगण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा- Jalgaon Crime: मित्राची मुलीवर वाईट नजर, आईचीही साथ! डोळ्यादेखत नको ते केलं, जळगावमधील घटना)
चिठ्ठीत काय लिहिलंयं?
मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिताना शिवशरण म्हणाला, "मी शिवशरण. मी मरत आहे.. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा व आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. 'तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये..' असे म्हणून तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे व आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा.... मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस."