
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातील महिलेच्या मित्राने तिच्यासमोर तिच्या 17 वर्षीय मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मित्राने केलेल्या या कृत्याचे आईने ही समर्थन केल्याने मुलीने थेट याप्रकरणी आईसह तिचा मित्राविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली.
या तक्रारीवरून मुलीच्या आईसह तिच्या मित्राविरुद्ध विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. मयूर शिंपी असे विनयभंग करणाऱ्या संस्थेचे नाव असून गुन्हा दाखल होताच मयूर शिंपी हा फरार झाला आहे.
Crime News: बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, पायावर नाक घासायला लावलं; क्लासमधील मुलींचा वाद टोकाला पोहचला
अल्पवयीन मुलीचे वडील कॉन्ट्रॅक्टर असून वडील घरी नसताना आईचा मित्र मयूर शिंपी हा पिझ्झा घेऊन येण्याच्या पाहण्याने घरी आला होता. आई चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली असता मयूर शिंपी या संशयिताने अल्पवयीन मुलीचा हात पकडून हाताचे चुंबन घेत मुलीच्या पाठीवर हात फिरवत तिचा विनयभंग केला. एवढंच नाही तर टीव्ही बंद करण्याच्या बहाण्याने मिठीत घेतले.
मात्र मुलीने यास विरोध करत संशयिताचे हात झटकले असता "बेटा तू मुलगी आहे चालतच" असं म्हणत मित्राच्या कृत्याचे समर्थन केले. एवढेच नाही तर आईच्या मित्राने अल्पवयीन मुलीच्या शिकवणी ठिकाणी जात शिकवणीच्या जिन्यावर मुलीला गाठून हात पकडून दुष्कृत्य करण्याचाही प्रयत्न केला. आईच्या मित्राकडून केले जात असलेले कृत्य व आईचे त्याला असलेले समर्थन याला वैतागून मुलीने पोलिसात धाव घेतली.
दिल्लीकडे निघालेली कार, पोलिसांना संशय आला, दरवाजा उघडताच... जळगावमध्ये मोठी कारवाई
अल्पवयीन मुलीने या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आईसह तिचा मित्र मयूर शिंपी याच्या विरुद्ध तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल होताच संशयित मयूर शिंपी हा फरार झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून गांभीर्याने सखोल तपासणी केली जात असून फरार संशयीताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world