दिवसभर काम केलं अन् घरी निघाल्या, मात्र वाटेत मृत्यूनं गाठलं; सोलापुरात ट्रकच्या धडकेत 5 महिलांचा मृत्यू

Solapur Accident : सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चिमकहुद बंडगर वाडी परिसरात ही घटना घडली आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे/संकेत कुलकर्णी, सोलापूर

ट्रकच्या धडकेत 5 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर दोन महिला गंभीर जखमी आहेत. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चिमकहुद बंडगर वाडी परिसरात दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Solapur Accident

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला कामगार कामाहून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी रस्त्यावर गाडीची वाट पाहत उभ्या होत्या त्यावेळी कोळसा वाहतूक करणारा एक ट्रक वेगाने येत होता. चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रकने उभ्या असलेल्या सात महिलांना धडक दिली.

(नक्की वाचा - तारेवर टॉवेल वाळत घालताना भालेकर कुटुंबाचा शेवट, पती-पत्नी आणि मुलाचा मृत्यू!)

धडक इतकी जोरदार होती की पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जमखी आहेत. सर्व महिला या कटफळ येथील रहिवासी होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले होते.

(नक्की वाचा- वसईत भर रस्त्यात तरूणीचा खून, हत्या केल्यानंतर त्याने...)

अपघात झाला त्यावेळी ट्रकमध्ये दोनजण होते. अपघात झाल्यानंतर त्यातील एकजण पळून गेला. तर एकला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पळालेल्या एकाचा पोलीस  तपास घेत आहेत. मात्र अचानक झालेल्या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

VIDEO

Topics mentioned in this article