सोलापुरातून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 2021 पासून सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेणारे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नक्की वाचा - INDIA मधील राहुल गांधींची जागा धोक्यात, ममतांच्या खांद्यावरुन लालूंची फायरिंग
धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला 11 पैकी एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही. धवलसिंह पाटील यांनी दिलेल्या राजीनामा पत्रातून काँग्रेसमध्ये असताना होणारी घुसमट व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षात खासदार प्रणिती शिंदे यांच्या गटाकडून आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ही मोहिते पाटील यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवत मोहिते पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा धवलसिंह मोहिते पाटलांनी प्रचार केला होता अशीही चर्चा आहे. दरम्यान,काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा रंगल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world