संकेत कुलकर्णी, पंढरपूर
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीच्या अगोदरच सोलापूर जिल्ह्यात भाजपला एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य चेतनसिंह केदार यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले आहे. केदार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द व्हावे. यासाठीची याचिका न्यायालयात आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांचे सांगोला शहरात आणि सांगोला ग्रामीणमध्ये अशा दोन ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव आहे. तसेच दोन्ही ठिकाणचे मतदान कार्डही वेगळे आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 31 नुसार कुठल्याही भारतीय नागरिकाला एकाच ठिकाणी मतदार नोंदणी करता येते. या कलमानुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आर. वाय. घुटुकडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केले आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar News: अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत सर्वात मोठा खुलासा; काय म्हणाले CM फडणवीस?)
महत्त्वाचे म्हणजे , चेतन सिंह केदार हे 2016 साली सांगोला नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर सध्या ते जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. केदार यांच्या पत्नी सुजाता केदार या सांगोला नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत.
त्यामुळे निवडणूक आयोगाची शहर व ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी मतदार यादीत नोंद करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवत. केदार यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याची थेट मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world