जाहिरात

Solapur News : रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर पती निलेश पहिल्यांदाच झाला व्यक्त; नेटकरी मात्र संतापले

२६ मे रोजी रोहिणीने हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.

Solapur News : रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर पती निलेश पहिल्यांदाच झाला व्यक्त; नेटकरी मात्र संतापले

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Solapur News : सोलापुरातील मंढळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरीतील प्रसिद्ध रील स्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला आहे. २६ मे रोजी रोहिणीने हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.

निलेशवर नेटकरी संतापले...

रोहिणीच्या आत्महत्येनंतर पती निलेशने सोशल मीडियावर भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रोहिणीने हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेतला तेव्हा पती निलेश हॉटेलबाहेर बसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जेव्हा रोहिणीने टोकाचं पाऊल उचललं तेव्हा तू कुठे होता असा सवाल निलेशला उपस्थित केला जात आहे. याशिवाय ती तुझी पत्नी होती, मोलकरीन नाही. तिला मालकीण म्हणत असताना दिवसभर तिच राबायची असंही एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा - 'हा धंदा सोपा नाय'; 'त्या' Video मध्ये हॉटेल ग्रामपंचायतीच्या मालकिणीच्या चेहऱ्यावर चिंता, रीलमध्येही उल्लेख

Latest and Breaking News on NDTV

निलेशची पत्नीसाठी भावुक करणारी पोस्ट...

माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं गं...या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही.जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं. आज चांगले दिवस यायला लागले होते. आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता. पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम... सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे... परत ये गं... तुला खूप काही सांगायचं बाकी आहे... तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com