Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील आळगे गाव परिसरातील शेतकऱ्यांनी वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात शेतीसाठी अपुरा वीजपुरवठा होत असताना कर्नाटकात आमची शेती समाविष्ट करण्याची परवानगी द्यावी, अशी आगळीवेगळी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांची आगळी-वेगळी मागणी...
अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील मूलभूत हक्क संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात भीमा नदीकाठावरील गावांना शेतीसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेती, चारा पिके आणि दुग्धव्यवसाय गंभीर संकटात सापडल्याचे म्हटले आहे. भीमा नदीच्या कर्नाटक बाजूला शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वीजपुरवठा सुधारला नाही, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्नाटक राज्यात जाऊन शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Navi Mumbai : 9 दिवस, दीड कोटी अन् 1000 सिम कार्ड; भीती दाखवित इंजिनियरचं भयंकर कांड
आम्हाला शेतीसाठी २ तास वीज मिळते ही वीज आम्हाला पुरत नाही आम्हाला कर्नाटकमध्ये सामील होण्याची परवानगी द्या अशी मागणी अक्कलकोट येथील नागरिकांची केली आहे.