Solapur ZP Result: राम सातपुतेंनी वचपा काढला! मोहिते-पाटील अन् जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा गुलाल

Solpaur ZP Result News: माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर 

Solpaur ZP Result News: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात 'हाय व्होल्टेज' मानल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्यात भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत भाजपने दहिगाव आणि गुरसाळे या महत्त्वाच्या गटांमध्ये विजय मिळवला आहे. या निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दहिगावमध्ये 'मुसंडी'; जानकरांना धक्का

दहिगाव जिल्हा परिषद गटातील लढत ही खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची होती. संस्कृती सातपुते यांनी जीवन जानकर यांचा पराभव केला. केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर दहिगाव गटातील दोन्ही पंचायत समिती जागांवरही भाजपने वर्चस्व मिळवले आहे.

Advertisement

सहानुभूतीचा फॅक्टर 

प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते आपल्या चार महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन गावोगावी फिरत होत्या. एका आईचा हा संघर्ष पाहून महिला वर्गाची मोठी सहानुभूती त्यांना मिळाली, जी विजयासाठी निर्णायक ठरली, असा अंदाज आहे.

मोहिते-पाटील कुटुंबालाही पराभवाचा धक्का

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी देखील हा निकाल धक्कादायक आहे.  माळशिरस तालुक्यातील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मिळवलेला हा विजय आगामी राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो.
 

Topics mentioned in this article