ST Bus Strike : ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा फटका, लाल परीला ब्रेक!

ऐन सणासुदीच्या काळात लाल परीच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी संप (Maharashtra ST Bus strike) पुकारला आहे. ऐन सणासुदीच्या काळात लाल परीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो संख्येने नागरिक कोकणात आणि आपआपल्या गावी जात असतात. मात्र लाल परीचे कर्मचारी आणि चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्यभरातील एकाही जिल्ह्यातील एसटी बस डेपोमधून एकही बस सोडण्यात आलेली नाही. हा संप केव्हापर्यंत सुरू राहील याबाबतही साशंकता आहे. या संपामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. (ST Bus strike)

अकरा एसटी कामगार संघटनाच्या कृती समितीने आज राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावे यांसारख्या अनेक मागण्यांसाठी आजपासून राज्यभरात एसटी  कर्मचाऱ्यांनी मोठ्या आंदोलन सुरू केले आहे. कृती समितीतर्फे शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी दोन सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास 3 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. 

Advertisement

नक्की वाचा - पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्डतोड वाढ; दर 400 पार, कोथिंबिरीला गावठी कोंबडीचा भाव

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ द्यावी अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून सुरू केलेली आंदोलन बंद केली जाणार नाही असा इशारा समितीने दिला आहे 

काय आहेत एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या? 

Advertisement
  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे.
  • कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत
  • घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी
  • 2015-2020 या कालावधीसाठी जाहीर केलेल्या रुपये 4849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी
  • सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी
  • आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून घ्याव्यात व स्वमालकीच्या एस.टी. बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच मनुष्य बळही उपलब्ध करून द्यावे.

नक्की वाचा - लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय

Advertisement