उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, विरोधीपक्ष नेतेपद कोणाच्या पदरी पडणार?

सोमवार (3 मार्च) पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

State Budget Session : सोमवार (3 मार्च) पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या अधिवेशनाकडे लागून आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना या घटनांवरुन विरोधी पक्षाकडून सरकारला लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मविआमध्ये समन्वयाचा अभाव...
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला. विशेष म्हणजे विधानसभेत दारूण पराभव झाल्यानंतरही तिन्ही पक्षांनी एकत्र येत यावर चर्चा घेतली नसल्याचं दिसून आवं. तीन पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले. अशा परिस्थितीत अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही, यावर ते सत्तापक्षाची कितपत कोंडी करू शकतील, हे अवलंबून असेल. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार! आरोपपत्रातील 10 ठळक मुद्दे

विरोधीपक्ष नेतेपद कोणाच्या पदरी?
एकीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे, तर दुसरीकडे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना, यासह कायदा-सुव्यवस्थेवरून गृह खात्याला विरोधक लक्ष्य करतील, अशी शक्यता आहे. विधानसभेतील दारूण पराभवानंतर नाउमेद झालेल्या महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून समन्वयाचा पूर्ण अभाव दिसत आहे. तीन पक्षांमधील नेते एकमेकांविरुद्ध आरोप करतानाही दिसून आले. अशा परिस्थितीत अधिवेशनामध्ये विरोधकांची एकजूट राहणार की नाही, यावर ते सत्तापक्षाची कितपत कोंडी करू शकतील, हे अवलंबून असेल. एकजूट दाखवण्याची विरोधकांना अधिवेशनात संधी असेल.
 

Advertisement