Palghar Crime News: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला मारहाण करत अत्याचार, पालघरमधील घटनेने खळबळ

Palghar Crime News : आरोपीने पीडित तरुणीला मारहाण करत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर जीवे माहण्याची धमकी देखील आरोपीने पीडित तरुणीला दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Palghar Crime News: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला मारहाण करत अत्याचार, पालघरमधील घटनेने खळबळ

मनोज सातवी, पालघर

महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घडना समोर आली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यात ही घडली आहे. पोलिसानी विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे वडील घरी निघाले होते. वाटेतच त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती त्यांना भेटला. घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांना आरोपीने लिफ्ट दिली. मात्र गावाजवळ आल्यानंतर शेठकडून पैसे आणायचे आहेत, असं सांगून आरोपींना पीडितेच्या वडिलांना शॉर्टकटने घरी जाण्यास सांगितलं. तर मुलीला घरी सोडतो असं सांगितलं. 

(नक्की वाचा-  Santosh Deshmukh Murder Case: बीड सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार?)

ओरापी ओळखीचा असल्याने वडिलांनी देखील विश्वास ठेवला आणि ते बाईकवरुन उतरले. त्यानंतर आरोपींनी मुलीला पुढे जंगलात नेले आणि तिथे तिला मारहाण करत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर जीवे माहण्याची धमकी देखील आरोपीने पीडित तरुणीला दिली.

(नक्की वाचा -  Viral News : तो iPhone देवाचा, मंदिर प्रशासनाच्या भूमिकेमुळे वादंग)

पीडित तरुणीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडितेने पालकांसह पोलीस्ट स्टेशनमध्ये जात याबाबत तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, अजित साबळे, पोलीस उप निरीक्षक, मयुर शेवाळे यांच्या नेतृत्वात तपास पथक नेमून तात्काळ कारवाई केली आणि अवघ्या दोन तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article