जाहिरात

Santosh Deshmukh Murder Case: बीड सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार?

Beed Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मास्टरमाईंड कोणीही असला तरी कारवाई होईल.

Santosh Deshmukh Murder Case: बीड सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार?

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणी हिवाळी अधिवेशनातही गाजलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडचं नाव घेत संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही. वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी करत विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या सर्व घडामोडींनंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेत कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिल्याने आज किंवा उद्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(नक्की वाचा-  Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे पहिल्यांदाच समोर आले, मारेकऱ्याबद्दल म्हणाले...)

सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार- CM फडणवीस

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मास्टरमाईंड कोणीही असला तरी कारवाई होईल. वाल्मिक कराडचे नाव घेऊन सांगतो तो कोणाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे कोणासोबत फोटो आहेत, याचा विचार न करता कारवाई होईल. कारण बीडमध्ये जी अराजकता आहे ती चुकीची आहे. यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. 

(नक्की वाचा-  Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचं एन्काऊंटर केला तर 51 लाखाचं बक्षीस अन्...)

न्यायालयीन चौकशी होणार - CM फडणवीस

गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांनाही संघटित गुन्ह्यामध्ये टाकले जाईल. बीड जिल्ह्यामध्ये एक मोहिम हातात घेऊन सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होईल. आयजी लेव्हल अधिकारी अंतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. तीन ते सहा महिन्यात याप्रकरणाची चौकशी होईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com