सुप्रिया सुळे यांच्या घातपाताचा प्रयत्न? पुणे-मुंबई प्रवासादरम्यान वाहनाला धडक; नंबर प्लेटही केली शेअर

सुप्रिया सुळे यांना धडक दिलेल्या वाहनाची नंबर प्लेटही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Supriya Sule Car Accident : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांचं निधन केवळ महाराष्ट्राच नाही तर देशाला धक्का आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या वाहनाला धडक दिली. सुप्रिया सुळे यांनी स्वत: याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी धडक दिलेल्या वाहनाची नंबर प्लेटही शेअर केली आहे. 

नक्की वाचा - Nida Khan: मतीन पटेलचं घर रडारवर! निदा खानला घरामध्ये दडवलं, आता महापालिका घरच तोडणार, संभाजीनगरमध्ये धमाका

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असताना एका कारने त्यांच्या वाहनाला डाव्या बाजूने धडक दिली. गाडीतील सगळे सुखरुप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांची दिली. याशिवाय गतीने आणि निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनी सीट बेल्ट लावला होता. त्यामुळे सुदैवाने कुणाला काहीच झालं नाही. 

Advertisement

अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंच्या घातपाताची भीती...

सुप्रिया सुळे यांच्या अपघातानंतर घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. शरद पवार गटाचे नेते सुनिल माने यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, अजित पवार यांचा घातपात करण्यात आला त्याच पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला गुजरात मधल्या एका गाडीने अतिशय भयानकपणे धडक दिली. सुप्रिया सुळे देशाच्या नेत्या आहेत. अजित दादा नंतर सुप्रिया सुळे महत्त्वाच्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळेंना अपघातात बरं वाईट करण्याचा हा प्रयत्न नव्हता ना अशी आमच्या मनात शंका आहे. राज्य सरकारने कसून चौकशी करावी अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.