अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितल्याने छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. ही मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांचा तात्काळ राजीनामाही घेण्यात आला होता. मात्र अवघ्या काही महिन्यातच सूरज चव्हाण यांना पक्षाने मोठी जबाबदारी देत त्यांची थेट राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरुनच आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अंजली दमानियांची टीका...
छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. "युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद ? छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले, हेच का महाराष्ट्राचे ‘Good Governance?'" असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारली जाणार
तसेच आता "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान! पण …… कमालीची बाब म्हणजे, अगदी २ आठवड्या पूर्वी, मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात, ह्याच राष्ट्रवादी पक्षाने, सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यालय येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे. मग असे अचानक काय झाले? काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने ‘जन सन्मान यात्रा ‘ काढली होती. दिसला का ह्यांचा जन सन्मान?" असा टोलाही दमानिया यांनी लगावला आहे.
दरम्यान, 20 जुलै रोजी रायगडमध्ये सुनील तटकरेंना निवेदन देताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र अवघ्या महिनाभरात सूरज चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दादांची कारवाई फक्त नावापुरतीच होती का? असा सवाल उपस्थित होत आहे.
निवडणुकांआधी निधीची खैरात! सरकारकडून 65 शहरांसाठी 500 कोटींचे वाटप