
मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच महायुती सरकारने महापालिका नगरपालिकांच्या विकासकामांसाठी दोन दिवसांत 500 कोटींचा निधी वितरित केला आहे. नगरविकास विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका, नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता तयारी सुरु केली आहे. राज्यातील महायुती सरकारने दोन दिवसांमध्ये राज्यभरातील विविध 65 नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका शहर क्षेत्राच्या विकासकामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी वितरित करण्याचे आदेश जारी केले आहेत. सोमवारनंतर पुन्हा काही शहरांसाठी निधी मिळणार आहे.
राज्यात 'अपना भांडार'च्या माध्यमातून खरेदी विक्रीची साखळी उभारली जाणार
या निधी वितरणात मुंबई उपनगरासाठी 36. 62 कोटी, नागपूर जिल्ह्यातील कामठी, महादुला, पिंपळा, बहादुरा या नगरपंचायतींसाठी 40 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, भंडणगड, दापोलीसाठी19.90 कोटी, कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, वडगाव, शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगलेसाठी16. 6 कोटी, नाशिक उद्योग भवनासाठी 16 कोटी व अन्य कामासाठी13. 75 कोटी असे एकूण30.36 कोटी 61 लाखांचा निधी दिला आहे.
बदलापूर व मुरबाडसह ठाण्यात १६.९० कोटी, सांगली जिल्ह्यातील १० नगरपालिकांसाठी १०.५ कोटी, कर्जत, कोपरगावसाठी २ कोटी, उरण (रायगड) साठी १५ कोटी, देऊळगाव, सिंदखेड (बुलडाणा) ५ कोटी, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, बल्लारपूर, पोचुर्णा नगरपंचायतीसाठी १० कोटी, मलकापूर (सातारा) २०.८० कोटी अशा राज्यातील ६५ नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका शहरांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेला.
नक्की वाचा - Marathi Ekikaran Samiti: अचानक प्रकाशझोतात आलेली मराठी एकीकरण समिती काय काम करते?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world