राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
'आपल्याविरोधात चुकीच्या माहितीच्या आधारे धादांत खोटी लक्षवेधी सुचना लावण्याचा प्रयत्न' झाल्याचा आरोप पुणे जिल्हा गौण खनिज अधिकारीपदाचा कार्यभार असलेल्या तहसिलदार ज्योती देवरेंनी केला आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या पीएसोबत ज्योती देवरेंचा संवाद या व्हायरल क्लिपमध्ये आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर ही क्लिप व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. गुरुवारपासून (27 जून ) सुरु होणाऱ्या अधिवेशनात या विषयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
काय आहे संवाद?
या संवादादरम्यान ज्योती देवरे या दानवेंचे पीए असलेल्या रामटेकेंना आपल्याविरोधात खोटी लक्ष्यवेधी लावल्याबाबत जाब विचारतायत. त्यावर रामटेके सारवासारव करत असल्याचं दिसून येतंय. याबाबत ज्योती देवरेंशी एनडीटीव्ही मराठीने संपर्क साधला असता, आपण त्याबाबतची तक्रार अंबादास दानवेंकडेही केल्याचं देवरेंनी सांगितलंय. अंबादास दानवेंनाही याबाबत विचारलं असता आपल्याला या प्रकाराची कल्पना नसल्याचं दानवे म्हणालेत. त्यामुळे लक्ष्यवेधी सुचनांच्या नावाखाली गैरप्रकार होतोय का असा प्रश्न उपस्थित झालाय.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची माहिती नव्हती असं म्हंटलंय. जनतेच्या माध्यमातून आमच्याकडं अनेक तक्रारी येत असतात. त्याच तक्रारींच्या आम्ही सूचना लावत असल्याचं दानवेंनी स्पष्ट केलंय.
( नक्की वाचा : 'एवढी काळजी असेल तर राजीनामा द्या', अजित पवारांना आव्हाडांचं आव्हान )
ज्योती देवरे यांनी स्वत: 'NDTV मराठी' वर बोलताना याबाबतच्या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी काय आरोप केले आहेत ते पाहूया
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world