जाहिरात

'एवढी काळजी असेल तर राजीनामा द्या', अजित पवारांना आव्हाडांचं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

'एवढी काळजी असेल तर राजीनामा द्या', अजित पवारांना आव्हाडांचं आव्हान
Jitendra Awhad Ajit Pawar
मुंबई:


वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असलेल्या NEET-UG 2024 या परीक्षेतील गैरकारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचा जीव सध्या टांगणीला लागलाय. या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडं सोपवण्यात आलाय. राज्य विधिमंडळाच्या आगमी अधिवेशनात या विषयाचे पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य करत याची चुणूक दाखवली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले आव्हाड?

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही एक सोसायटी कायद्याच्या अंतर्गत काम करणारी खासगी संस्था आहे. ही संस्था सरकारी अनुदानित वैद्यकीय संस्थांमधील प्रवेश मॅनेज करत आहे. त्यामुळे सरकारला पारदर्शकता आणि निष्पक्षपणा ही तत्व पाळता येत नाही. 

( नक्की वाचा : NEET परीक्षेचा गोंधळ काय आहे? ग्रेस मार्क्स ते पेपर लीक सर्व प्रश्नांची वाचा उत्तरं )
 

महाराष्ट्रातील एनडीए/भाजपा सरकारचा भाग असलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मेडिकलचं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडं प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी एनटीएच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करावा. विद्यार्थ्यांचे कष्ट आणि पालकांच्या गुंतवणूकीचं महत्त्व समजून घ्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विद्यार्थ्यांना भेटण्याऐवजी या विषयाची जबाबदारी असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. अथवा, केंद्र सरकारचा निषेध करावा. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची इतकी काळजी असेल तर राजीनामा द्यावा,' अशी मागणी आव्हाड यांनी केलीय. त्याचबरोबर महाराष्ट्रानं एनटीए रद्द करुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा सुरु करावी, अशी मागणीही आव्हाड यांनी या ट्विटमध्ये केली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com