Jalgaon Train Accident: आगीच्या अफवेने ट्रेनमधून उतरलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एक्सप्रेसने उडवल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली. जळगावच्या पाचोऱ्याजवळ घडलेल्या या भयंकर दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमका कसा झाला अपघात?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लखनऊहून मुंबईहकडे निघालेली पुष्पक एक्सप्रेस ही गाडी पारंडा स्थानकाजवळ येत असताना ही मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसने स्टेशन जवळ आल्यानंतर ब्रेक मारला ज्यामुळे चाके आणि रुळामध्ये घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या पाहून काही प्रवाशांना ट्रेनला आग लागली असे वाटले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रवाशांनी ट्रेनमध्ये आग लागली, आग लागली अशी बातमी जनरल डब्यात सर्वत्र पसरवली ज्यामुळे गाडीतील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी आगीच्या भितीने काही जणांनी चेन खेचून गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर 30- 35 प्रवासी रेल्वे रुळावर उतरले. मात्र याचवेळी दुसऱ्या दिशेने कर्नाटक एक्सप्रेस येत होती, ज्याखाली पुष्पक एक्सप्रेसमधील अनेक प्रवासी चिरडले गेले. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण…
या दुर्घटनेत अनेकांचा जागीच मृत्यू झाला असून काही ्प्रवासी जखमी झालेत. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन तसेच रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी 11 रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ट्वीट!
जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती आताच मी प्रशासनाकडून घेतली आहे. आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती मिळते. रेल्वेचे अधिकारी आणि त्यांची बचाव पथके देखील घटनास्थळी पोहचत आहेत. नक्की किती प्रवासी जखमी आहेत आणि मरण पावले आहेत याविषयी अद्याप आकडेवारी हाती आलेली नाही. मात्र तातडीने बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावे आणि योग्य ते उपचार करावेत अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, गाडीमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या. याचवेळी दुसऱ्या दिशेने भरधाव वेगाने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. अचानक प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्याने अनेक प्रवासी कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडले गेल्याचेही सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा- Bacchu Kadu : शरद पवार-उद्धव ठाकरे केंद्रात भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा मोठा दावा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world