संकेत कुलकर्णी, पंढरपूर
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. राजकारणात कुणीही कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे एकमेकांवर आगपाखड करणारे राजकारणी कधीही एकत्र येऊ शकतात. राज्याच्या राजकारणातही तीच परिस्थिती मागील काही वर्षात आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊ शकतो, असा मोठा दावा माजी आमदार बच्चू कडू यांनी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देशात मोठ्या राजकीय उलथा-पालथी होणार आहेत. अशामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पर्याय म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच केंद्रात भाजपसोबत दिसतील, असा दावा माजी आमदार बच्चू कडू यांनी पंढरपूरमध्ये केला आहे.
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक-दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत. मात्र ते गेल्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कदाचित भाजपसोबत असतील. अशावेळी राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबाबत 'गरज सरो आणि वैद्य मरो', अशी भूमिका भाजपची राहू शकते.
(नक्की वाचा- Maharashtra Politics: संजय राऊतांना काळे फासणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा? कारण...)
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गरज संपली आहे. भाजपची ही मोघलाई निती आहे. आपल्यापासून लांब चालला की कापून टाकायचं अशी ही मोघलाई आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
( नक्की वाचा : Saif Ali Khan Net Worth : सैफला उगाच म्हणत नाहीत छोटे नवाब! संपत्ती समजल्यावर पडाल चाट )
बच्चू कडू यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचा घेतला. राज्यात आलेलं सरकारच भ्रष्ट मार्गाने आले आहे. त्यामुळे त्यांचे मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. सरकारी योजनांमध्ये 4-5 टक्के भ्रष्टाचार होतच असतो, असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world