ठाणे - बेलापूर महामार्गावर (Thane - Belapur Highway) घनसोलीजवळ ठाण्याच्या दिशेने जात असलेला एक कंटेनर आज सकाळी अनियंत्रित होऊन रस्त्यावरच उलटला. या अपघातामुळे घनसोली जिओ पॉइंटपासून ते कोपरखैरणे डीमार्टपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही वेळेसाठी संपूर्ण मार्ग ठप्प झाला होता.
नक्की वाचा - Pune Mumbai Shivneri driver : पुणे-मुंबई शिवनेरीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात; दारूचे घोट घेत घेत चालवली बस...
अपघाताची माहिती मिळताच नवी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. कंटेनर हटवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. दुपारपर्यंत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येईल, असं सांगितलं जात आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी भारी वाहनांवर वेळोवेळी निर्बंध आणि अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.