Thane News : लेकाच्या वाढदिवसाची भयाण रात्र; केक खाल्ल्यानंतर थेट रुग्णालय गाठलं, एक्सरेमध्ये भयंकर दिसलं

३१ मे रोजी स्नेहा शेलार यांनी त्यांचा मुलगा रेयांशचा तिसरा वाढदिवस 'थिम केक' कापून साजरा केला होता. वाढदिवस साजरा करताना सर्वजण आनंदात होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Thane News : ठाण्यातील एका बेकरीच्या निष्काळजीपणामुळे एका ३ वर्षांच्या चिमुरड्याने केकवरील चॉकलेट बॉलिंग पिनमध्ये लपवलेल्या दोन धातूच्या सुया (तारा) नकळत गिळल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे शेलार कुटुंबाला ४८ तासांचा तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागला. ३१ मे रोजी स्नेहा शेलार यांनी त्यांचा मुलगा रेयांशचा तिसरा वाढदिवस 'थिम केक' कापून साजरा केला होता. वाढदिवस साजरा करताना सर्वजण आनंदात होते. त्यांचा मुलगा रेयांशदेखील बॉलिंग पिन आवडीने खात असल्याचं व्हिडिओमध्येही दिसत आहे. त्याचवेळी एन अनर्थ घडला, मात्र कुटुंबीयाला याबाबत काहीच माहिती नव्हती. 

वाढदिवशीच मुलाला रुग्णालयात केलं दाखल...



स्नेहा शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी केकवरील चॉकलेटच्या पिनमध्ये धातूच्या तारा असल्याचे मोठ्या मुलांनी पालकांच्या निदर्शनास आणून दिले. रेयांशने या तारा गिळल्याच्या भीतीने कुटुंबीयांनी ज्युपिटर हॉस्पिटल येथे नेलं. जिथं एक्स-रेमध्ये त्याच्या लहान आतड्यात दोन सुया अडकल्याचं दिसलं. ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाट पाहण्याचा सल्ला दिला. सुदैवाने, ४८ तासांनंतर या तारा नैसर्गिकरीत्या शरीराबाहेर पडल्या आणि रेयांश याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Video : 'त्यांनी भटक्या कुत्र्याचा जीव घेतला'; मराठी अभिनेत्री ओक्साबोक्शी रडली, न्यायाची केली मागणी
 
केक लहान मुलांसाठी आहे हे माहीत असूनही बेकरीने कोणतीही पूर्वसूचना न देता अंतर्गत आधारासाठी या घातक तारा वापरल्या होत्या. या घटनेनंतर स्नेहा शेलार यांनी सोशल मीडियाद्वारे इतर पालकांना मुलांसाठी केक घेताना त्यातील अंतर्गत सजावट खाण्यायोग्य आहे का, याची खात्री करून घेण्याचं आवाहन केलं आहे.

Topics mentioned in this article