जाहिरात

Thane News: कळव्यात राडा! अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीआरपी, आरपीएफ कर्मचाऱ्यांना मारहाण

मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार झाली नसल्याचेही समोर आली आहे. 

Thane News: कळव्यात राडा! अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीआरपी, आरपीएफ कर्मचाऱ्यांना मारहाण

रिझवान शेख, ठाणे:

Kalwa Railway Station News: मुंबईमधील अनेक रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांनी गर्दी केली आहे ज्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या अनधिकृत फेरीवाल्यांवर जीआरपी तसेच आरपीएफकडून वारंवार कारवाईही केली जाते. अशीच कारवाई सुरु असताना  कळवा रेल्वे स्थानकाबाहेर  अनधिकृत फेरीवाल्यांनी जी.आर.पी आणि आर.पी.एफ कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

फेरीवाल्यांकडून जीआरपी- आरपीएफ कर्मचाऱ्यांना मारहाण...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळवा रेल्वे स्थानकाबाहेर जीआरपी (गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस) आणि आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार झाली नसल्याचेही समोर आली आहे. 

जीआरपी आणि आरपीएफ कर्मचारी कळवा स्थानकावर बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करत होते आणि त्यांचे तराजू आणि इतर वस्तू जप्त करत होते. यावेळी काही कर्मचारी गणवेश नसतानाही उपस्थित होते त्यामुळे फेरीवाले संतप्त झाले, त्यांची कर्मचाऱ्यांशी बाचाबाचीही झाली, याचे रुपांतर मारहाणीत होऊन जोरदार राडा झाला. 

Kalyan News: धक्कादायक! टोपीवरून वाद, शेजाऱ्यांनी गर्भवतीच्या पोटात लाथ मारली अन् भयंकर घडलं

तक्रार दाखल नाही...

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊनही ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात अद्याप हाणामारीची नोंद झालेली नाही. असा दावा केला जात आहे  जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांचे वजनाचे तराजू ही जप्त केले आहेत आणि हेच या घटनेचे कारण होते.  अनधिकृत फेरीवाले उभारणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना राग आला आणि त्यांनी जीआरपी आणि आरपीएफशी भांडण केल्याचे समोर येत आहे. 

(नक्की वाचा-  साईबाबा आणि बालाजी भक्तांसाठी खूशखबर! शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरु, राज्यात 11 ठिकाणी थांबणार गाडी)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com