
अमोल गावंडे
जगातील एक आश्चर्य म्हणजे लोणारचे सरोवर. गेल्या काही वर्षापासून या सरोवरात काही आश्चर्यकारक बदल होत आहेत. कोरोना काळात या सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाले होते. त्यामुळे सरोवराचे पाणी गुलाबी कसे झाले यावर संशोधन सुरू झाले. त्याचाही उलगडा झाला. पणाता हेच गुलाबी पाण्यानं पुन्हा एकदा रंग बदलला असून ते हिरवं झालं आहे.

पाणी हिरवे का झाले?
चार वर्षांपूर्वी लोणार सरोवरातील पाणी हे अचानकपणे गुलाबी रंगाचे झाले होते. यामुळे हा विषय देशभर चर्चिला गेला. वैज्ञानिकदृष्ट्या त्याची करणमीमांसाही झाली. त्यांच्या नुसार ‘पाण्यामध्ये असेलेल्या सजीवांना, पाण्याच्या क्षारतेतून उष्णता तसंच विरघळलेल्या स्वरूपाचा ऑक्सिजन मिळाला. तिथे पिग्मेंटेशन होऊन रंग बदलला. जर केरोटीन सारखे पिग्मेंटेशन तयार झाले, तर त्याला गुलाबी रंग प्राप्त होतो. लोणारमध्ये लाल रंगाचे पिग्मेंटेशन तयार झाल्यामुळे सरोवराचे पाणी गुलाबी झाले होते. उष्णतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाप्पीभवन झाले. त्याचा परिणाम म्हणून पाण्यात क्षाराचे आणि अम्लाचे प्रमाणही वाढले. हे तिथल्या जिवांसाठी पोषक मानले जाते. हेच जीव सुर्याच्या तिव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी गुलाही रंग सोडत असतात. त्यामुळेच हे पाणी गुलाबी दिसते.

आता या सरोवराचे पाणी पुन्हा हिरव्या रंगाचे झाले आहे. याच्या कारणांचा शोध घेतला असता, सरोवरात जर शेवाळासारखी वनस्पती असली, तर त्यामध्ये क्लोरोफीलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आता या सरोवरातील पाण्याचा रंग पुर्वी प्रमाणे हिरवा झाला आहे. या सरोवर परिसरात सध्या मानवी हस्तक्षेपामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. लोणार सरोवराचे पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे सरोवरामधील जैव विविधता धोक्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world